महापालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

निवडणुका होणाऱ्या महापालिका - 
1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी-चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर

मुंबई - मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी दहा महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज (बुधवार) निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंदर्भात घोषणा करणार आहे. या परिषदेत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. सहारिया यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणुका फेब्रुवारीमध्ये घेण्याचे संकेत दिले होते. 

महापालिकांसाठी 21 किंवा 22 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशातील महासंग्रामाची तारीख घोषित झाली असताना महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आचारसंहिता 7 किंवा 9 फेब्रुवारी रोजी घोषित होईल, असे सांगत आहेत.

निवडणुका होणाऱ्या महापालिका - 
1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी-चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर

Web Title: election commission will declared municipal corporation voting dates