'निवडणूक आल्यावर मोदींना रामाची आठवण' - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सातारा - गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणूक आल्यावर रामाची आठवण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

सातारा - गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणूक आल्यावर रामाची आठवण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

पाटणचे "राष्ट्रवादी'चे माजी आमदार विक्रमसिंह पाटण यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. साडेचार वर्षांत विकासाची स्वप्ने दाखविली, त्यातून साध्य काहीही झालेले नाही. त्यामुळे जनता आपल्यापासून दूर जातेय हे पाहून त्यांनी आता रामाच्या नावाचा जप सुरू केला आहे, असे ते म्हणाले. शरद पवार म्हणाले, "आज देशाचे राजकारण बदलले आहे. साडेचार वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली वेगळे वातावरण निर्माण केले. लोकांना वाटले आपण त्यांना संधी द्यावी. मूठभर जणांच्या हिताची जपणूक करणारे आणि धार्मिक, जातीयवादाचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते आज देशात राज्य करतात. हे आता देशातील जनतेच्या लक्षात आले आहे. राममंदिराच्या नावाखाली गेली दहा वर्षे राजकारण केले आहे. अटलबिहारी पंतप्रधान असताना सत्ता हातात होती. गेली साडेचार वर्षे मोदींना सत्ता हातात असताना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणूक आल्यावर रामाची आठवण झाली आहे.'

गेल्या साडे चार वर्षांत सरकारला काही करता आले नाही, आता निवडणुका आल्या की राममंदिराची आठवण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. 

पवार म्हणाले, 'नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना निष्पाप लोकांच्या हत्या करण्यात आल्या. लोकांना जाळून मारण्यात आले. त्या सत्याबाबत गप्प असणारा भाजप देशात द्वेषाचे राजकारण करत आहे. विकासाच्या मुद्यावर मोदी सरकार अपयशी ठरले असून, जनता त्यांच्यापासून बाजूला जाऊ लागली आहे. निवडणुका जवळ आल्या, की जातीय ध्रुवीकरणासाठी राममंदिराची भाजपला आठवण येते. पारदर्शक कारभार व विकासाच्या मुद्यावर 2014 मध्ये देशात सत्ता मिळविलेले 530 कोटींचे राफेल विमान 1600 कोटींत खरेदी करतात. राफेलबाबत जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खरेदी व्यवहाराचा खुलासा करत नाहीत.'' समाजात दरी व वैरभावना वाढवणाऱ्या राज्यकर्त्यांना सत्तेची सूत्रे देणे योग्य नाही, त्यासाठी अशा चुकीच्या हातांतून सत्ता काढण्याचा कॉंग्रेस व घटक पक्षांनी संकल्प केला आहे. त्यासाठी परिवर्तनाच्या लढाईत जनतेने साथ द्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी आज येथे केले. 

कार्याचा मी साक्षीदार... 
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची 30 वर्षांची ओळख करून देताना पवार यांनी त्यांच्या कार्याचा साक्षीदार असल्याचे सांगून पवनऊर्जा, मुंबईतील सागरी सेतू, मुंबई-पुणे, पुणे-सातारा व सातारा-कागल या राष्ट्रीय महामार्गाची संकल्पना त्यांचीच असल्याचे सांगितले. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकारांचे नेतृत्वही लोकमान्य होऊ लागले असून, त्यांना आशीर्वाद असल्याचे सांगितले. 

Web Title: Election Narendra Modi Ram Temple Sharad Pawar Politics