निवडणूक यंत्रणा भ्रष्ट : उद्धव ठाकरे

गुरुवार, 31 मे 2018

सध्या लोकशाही धोक्यात आहे, म्हणण्यापेक्षा लोकशाही संपली का, असा प्रश्न पडला आहे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई : सध्या लोकशाही धोक्यात आहे, म्हणण्यापेक्षा लोकशाही संपली का, असा प्रश्न पडला आहे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक यंत्रणा भ्रष्ट आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर जोरदार टीका केली. 

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -

- भाजपचा पराभवातून मला आनंद होत नाही. 

- सरकार आले तेव्हा वाटले पुढची 25 वर्षे सरकार जात नाही.

- पालघर लोकसभा शिवसेनेने लढवली होती. 

- वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेना मदतीला आली.

- 8 लाख मतदारांपैकी 6 लाख मतदारांनी भाजपला नाकारले. 

- भाजपची लोकप्रियता झपाट्याने घटली. 

- उत्तरप्रदेशच्या जनतेने योगींची मस्ती उतरवली. 

- मला आता वाटते निवडणुका संपल्या. 

- योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, भाजपला हा अपमान मान्य आहे का ? 

- निवडणूक आयुक्तांचा यामध्ये नियंत्रण आहे का, याचा प्रश्न आहे.

- एकूणच प्रकार पाहिल्यानंतर निवडणूक आयोग जी बंधने टाकते पण आम्ही ती स्वीकारतो. 

- शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. 

- भाजपला आता मित्रांची गरज नाही. 

- निवडणूक यंत्रणाही भ्रष्ट आहे.

- मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला. 

- काही जणांना पैसे वाटताना पकडले होते. 

- लाखभर मते वाढल्याचे पुरावे आता द्या.

- लोकशाही धोक्यात आहे, म्हणण्यापेक्षा लोकशाही संपली का, असा प्रश्न पडला आहे.

- लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 

- निवडणुकीत झालेला हा पराभव मी मानायला तयार नाही. हा पराभव असूच शकत नाही.

- सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढवायची का की लढवू नये का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकेल. 

- निवडणूकीदरम्यान झालेल्या गोंधळाला जबाबदार निवडणूक अधिकाऱ्यांची बदली नाहीतर निलंबित करणे गरजेचे.

- निवडणूक आयुक्तपदासाठी निवडणूक घ्या. 

Web Title: Election process is corrupt says uddhav Thackeray