यापुढे निवडणुका स्वबळावरच ! - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नाशिक - शिवसेनेत सगळे लढण्याच्याच मूडमध्ये आहेत. स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. त्यामुळे कुणीही द्विधा मनःस्थितीत नाही. पण, शिवसेना- भाजप युती २५ वर्षांपासूनची असल्याने काही काळ संभ्रमाची स्थिती राहणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार केला.

ठाकरे यांनी नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रतील इतर लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याने हा विषय आमच्यासाठी संपला आहे. मात्र, हा प्रकल्प विदर्भात व्हावा अशी भाजप आमदारांची मागणी आहे, ती योग्यही आहे. भाजपने त्यांच्या आमदारांची शाळा घेतली, तरी त्यांच्या लक्षात येईल. विदर्भाच्या विकासाच्या पोकळ गप्पा करण्यापेक्षा नाणार प्रकल्प विदर्भात न्यावा. रिफायनरी प्रकल्पाला किनाराच लागतो असे नाही आणि समजा, विदर्भात समुद्र लागलाच, तर त्यांनी मोदी यांना सांगावे, ते काहीही करू शकतात. अवघ्या पाच मिनिटांत ते विदर्भाला समुद्रही देतील. रजनीकांतसुद्धा मोदींना घाबरू लागले आहेत, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

शिवसेना वनगा कुटुंबीयांसोबत
चिंतामण वनगा यांनी संघ, हिंदुत्व, भाजप यांच्यासाठी आयुष्य वेचले. दुर्गम भागात त्यांनी हिंदुत्वाची पाळेमुळे रुजविली. शिवसेना वनगा कुटुंबीयांच्या पाठिशी ठाम राहील, असा शब्द शिवसेनेने दिला आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार असतील का, याविषयी मात्र संदिग्ध उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘हा विषय वनगा कुटुंबाचा आहे. मी माझी इच्छा त्यांच्यावर लादणार नाही.’’

Web Title: Elections on the swab uddhav thackeray