"रासप'च्या चिन्हावरच लढणार - जानकर 

"रासप'च्या चिन्हावरच लढणार - जानकर 

मुंबई - आगामी निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) चिन्हावरच लढवल्या जातील, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी आज मंत्रालयात बोलताना दिली. विधानसभेची आगामी निवडणूक घटक पक्षांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रयत क्रांती संघटनेचे नेते व मंत्री सदाभाऊ खोत यांनी कमळाच्या चिन्हावर लढू, असे म्हटले आहे. तर, "शिवसंग्राम'चे विनायक मेटे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढली होती. 

पक्षाचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे. तसेच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल, तर स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवणे गरजेचे आहे. "रासप'ने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे, असे जानकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com