Power shortage : एप्रिलमध्ये लाईट जाणार, 18 दिवस होणार शट डाऊन?

अगोदरच हवामान खात्याने तीव्र उष्णतेची शक्यता व्यक्त केली आहे
Power shortage: Grid managers brace for 18 alert days in April
Power shortage: Grid managers brace for 18 alert days in AprilSakal

Power shortage : एप्रिलमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. अगोदरच हवामान खात्याने तीव्र उष्णतेची शक्यता व्यक्त केली आहे, तर नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरचे म्हणणे आहे की एप्रिलमध्ये लोकांना वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो.

या वर्षी एप्रिलमध्ये 230 GW (Giga Watt) च्या मागणीत 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या वीज ग्रीडने याबाबत तयारी सुरू केली आहे. (Power shortage: Grid managers brace for 18 alert days in April)

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर (NLDC) ने म्हटले आहे की एप्रिलमध्ये सिस्टम ऑपरेटर 18 दिवस अलर्टवर असतील, ज्यामुळे लोकांना वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या वर्षी जुलैमध्ये 211.6 GW विजेची मागणी करण्यात आली होती, जी सर्वाधिक होती. 16 मार्च ते 30 जून या कालावधीत कोळशावर चालणारे वीज प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

युनिट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत :

एवढेच नाही तर एनटीपीसी लिमिटेडचे ​​सुमारे पाच हजार मेगावॅट युनिट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात तलावांमध्ये पाण्याची पातळी चांगली आहे, परंतु दक्षिणेकडील प्रदेशात तलावांमध्ये पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Power shortage: Grid managers brace for 18 alert days in April
Gold Silver Price : गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

अशा स्थितीत पाण्यापासून विजेचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. याबाबत दक्षिणेत पाण्याची बचत करण्यास सांगितले आहे. जेणेकरून एप्रिलमध्ये संध्याकाळच्या वेळेत वीज निर्मितीसाठी त्याचा वापर करता येईल.

प्लांट्सच्या बांधकामाला उशीर होण्याचे कारण :

देशातील 200 मेगावॅट कोळशावर चालणारे औष्णिक ऊर्जा प्रकल्प 25 वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. ते जुन्या तंत्रज्ञानावर चालतात आणि त्यांची विश्वासार्हता सर्वात कमी आहे.

आता देशात विजेची मागणी वाढत असल्याने कालबाह्य झालेल्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांच्या जागी सुपरक्रिटिकल कोळसा चालणारे प्लांट लावणे अत्यंत आवश्यक आहे.

वीज प्रकल्पाच्या उभारणीला होत असलेल्या दिरंगाईमुळे एप्रिलमध्ये विजेचे संकट निर्माण होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Power shortage: Grid managers brace for 18 alert days in April
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com