राज्यातील 11 हजार  ग्रामपंचायती हागणदारीमुक्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झाल्या असून, सिंधुदुर्गनंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 

मुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झाल्या असून, सिंधुदुर्गनंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 

लोणीकर पुढे म्हणाले, ""देशात दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (6324), तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड (5608) राज्य आहे; तर महाराष्ट्रातील 59 तालुके देखील हागणदारीमुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची घोषणा केली होती. या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच राज्यात सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. व्यापक लोकसहभागासह सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणांचा या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग मिळत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करत असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. 

2016-17 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रामध्ये 18 लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थेट लोकांपर्यंत जाऊन वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी राज्यभर नुकतेच एक अभियान राबविण्यात आले. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत स्वच्छ महाराष्ट्रासाठी - अठरा लाख भेटी या नावाने हे अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही या अभियानादरम्यान आपापल्या कार्यक्षेत्रात गृहभेटी देण्याबाबत सूचना केल्या होत्या. 

ग्रामीण भागात 70 टक्के कुटुंबांकडे शौचालय 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मार्च 2017 पर्यंत 10 जिल्हे हागणदारीमुक्त होत आहेत. त्यानंतर उर्वरित 23 जिल्हे मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करून महाराष्ट्र राज्य स्वच्छ राज्य घोषित करण्याबाबचा संपूर्ण कृती कार्यक्रम विभागाने तयार केलेला आहे. राज्यातील एकूण ग्रामीण कुटुंबांपैकी 70.44 टक्के कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा निर्माण करण्यात शासन यशस्वी झालेले आहे. उर्वरित कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक प्रयत्न होत आहेत, अशी माहितीही लोणीकर यांनी दिली. 

Web Title: eleven thousand village haganadari free state