पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळणारच - गिरीश बापट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई  - रास्त भाव दुकानांतून धान्य घेणारा एकही पात्र लाभार्थी धान्याला मुकणार नाही. त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

रास्तभाव दुकानातील पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार ऑथेंटिकेशन पुरसे आहे. आधार ऑथेंटिकेशन न झाल्यास ईकेवायसी करून धान्य वितरण करण्यात येणार आहे. तसेच आधार जोडलेले नसलेल्या सदस्यांचे ईकेवायसी करून धान्य वितरण होईल. हे तिन्ही पर्याय शक्‍य नसल्यास रूट नॉमिनीच्या आधार ऑथेंटिकेशनद्वारे धान्य वितरण केले जाईल, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली. 

शिधापत्रिकेवरील माहिती पॉस मशिनवर नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणीची प्रत, सरकारी ओळखपत्र/बॅंकेचे फोटो पासबुक इत्यादी विभागाच्या वेबसाईटवरील घोषित कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्यांकडून मिळवून त्यांना धान्य देण्यात येईल. हा पर्याय एकदाच वापरता येणार आहे. जिल्हाधिकारी, नियंत्रक शिधावाटप अधिकारी, मुंबई यांनी "नो नेटवर्क एफपीएस'ची समस्या असल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत धान्य वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

Web Title: Eligible beneficiaries will get grains - bapat