सेवा क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे भांडार!

सेवा क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे भांडार!

मुंबई - कारखाना उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती खुंटली असली, तरी सेवा क्षेत्रांमधील रोजगाराचे भांडार सरकारसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या वर्षभरात किरकोळ व्यापार (रिटेल), ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि औषध निर्माण, सौंदर्यप्रसाधने, बॅंकिंग आणि विमा उद्योग, ऑटोमोबाईल, वाहतूक, लॉजिस्टिक्‍स, साठवणूक आणि पॅकेजिंग, फळप्रक्रिया; तसेच मीडिया आणि एंटरटेन्मेंट या १० क्षेत्रांत नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.

भारतातील विक्री क्षेत्रात येत्या तीन वर्षांत अडीच लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. सुधारणा केल्यास एक कोटी रोजगार उपलब्ध होतील. एफएमसीजी आणि एफएमसीडी आदी क्षेत्रांत ३० टक्के नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. संघटित किरकोळ व्यापारापैकी ५० टक्‍के नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे. मुंबईतील विविध क्षेत्रांमध्ये जवळपास ३ लाख ३५ हजार सेल्स प्रोफेशनल काम करत असून, देशातील एकूण १५ लाख विक्रीविषयक कुशल मनुष्यबळामध्ये हे प्रमाण २२ टक्के आहे. परंतु जीएसटी, एफडीआय, डिजिटायझेशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या धोरणात्मक व तंत्रज्ञानविषयक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. 

ई-पेमेंट्‌समध्ये ८ टक्के आणि कृत्रिम बुद्धिमता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) क्षेत्रात १५ ते २५ टक्के रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. संघटित रिटेल क्षेत्रात ६५ टक्के कुशल मनुष्यबळाची चणचण भासत आहे. पर्यटन, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अंदाजे ३५ टक्‍के आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रात अंदाजे ३० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. विक्री वगळता, इंजिनिअरिंग आणि डिझाइन, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, अकाउंट्‌स या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 

रिटेल, ई-कॉमर्समध्ये साडेतीन लाख नोकऱ्या वाढतील. ‘एफएमसीजी’ क्षेत्रामध्ये विक्री प्रतिनिधी, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, सेल्स को-ऑर्डिनेटर, टेरिटरी सेल्स इन-चार्ज व सेल्स ऑफिसर यांना मागणी राहील. नव्याने उदयास आलेल्या ब्लॉकचेन क्षेत्रात बंगळूर, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद यांसह अनेक शहरांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. बंगळुरात सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के नोकऱ्या उपलब्ध आहेत. मुंबईत १३ टक्के आणि पुण्यात ७ टक्के रोजगार उपलब्ध आहेत. ब्लॉकचेन रिलेटेड प्रॉडक्‍ट आणि सर्व्हिस क्षेत्रातील रोजगार हे आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

बहुतांश नोकऱ्या बॅकिंग, विमा आणि रिटेल क्षेत्रांमध्ये निर्माण होणार आहेत. शहरीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब, धोरणांमधील सुलभता, ‘एफडीआय’चा वाढता ओघ यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. सेवा क्षेत्र आघाडीवर राहील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- रितुपर्ण चक्रवर्ती, सह-संस्थापक, टीमलीज सर्व्हिसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com