Hasan Mushrif Ed Raid: हसन मुश्रीफांचे पाय आणखी खोलात; EDने धाडलं समन्स, सोमवारी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif Ed Raid

Hasan Mushrif Ed Raid: हसन मुश्रीफांचे पाय आणखी खोलात; EDने धाडलं समन्स, सोमवारी...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.

यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकशीचा वेळ वाढतच गेल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मुश्रीफांच्या एका कार्यकर्त्यांने आपला रोष व्यक्त करताना आपलं डोकं फोडून घेतलं.  तर घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

आता मात्र ED ने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावला असून सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता मुश्रीफांचे पाय खोलात जाताना दिसत आहे.

दरम्यान आज सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी झाली. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी सकाळी 7 वाजता दाखल झाले होते. मात्र हसन मुश्रीफ हे घरी नव्हते, दीड महिन्यामध्ये झालेली ही तिसरी कारवाई आहे.

आज झालेल्या ईडीच्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले.

नेमकं काय प्रकरण?

हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आले आणि ते कुठून आणि कसे आले याबाबत माहिती ईडीला मिळालेली नाही. हे पैसे अवैध मार्गाने आले असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली होती. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने बुधवारी पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून कागदपत्र जप्त करण्यात आले होते.

टॅग्स :Hasan Mushrif