
Engineering Admission: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट्स; राज्यात आजपासून अभियांत्रिकी प्रवेश सुरू
प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून (ता. २) सुरवात होत आहे. राज्यात एकूण १ लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावी व बारावीचे निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या आसनक्रमांकाद्वारे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना नव्या उद्योगक्षेत्रातील मागणीनुसार अभ्यासक्रमात अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांचे पर्याय दिले गेले आहेत.
दरवर्षी प्रवेशीत विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. मागील चार वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के वाढ व मागच्या वर्षी १५ टक्के वाढ झालेली आहे. पदविका अभ्यासक्रमांना एकूण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामध्ये अमरावती विभाग ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपूर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के, पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झालेले आहेत.
प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्याचे आयोजन असे
या वर्षीपासून ९ शासकीय व ३० विनानुदानित संस्थामध्ये २४६० प्रवेशक्षमतेचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन ॲण्ड रोबोटीक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग ॲण्ड बीग डाटा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व आयओटी अभ्यासक्रमाची सुरवात
उमेदवारांना ‘मराठी - इंग्रजी (द्विभाषिक) अभ्यासक्रम
ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल अॅपवर
कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई - स्क्रूटनीची संकल्पना
दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधाकेंद्रांची स्थापना
प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले होते .
संकेतस्थळावर व्हीडीओद्वारे प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन
प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळणार
या बाबी आवश्यक
इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर.
मागील चार वर्षात वाढता प्रतिसाद.
कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगाराचा उत्तम पर्याय.
पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढती.
राज्यात २०२२-२३ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्के झालेली आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-2४ करिता एकूण ३७५ संस्थांची प्रवेशक्षमता जवळपास १,००,००० आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
उद्योगांचे अभिप्राय घेऊन Ischeme ( Industry Curriculum ) लागू.
एक्सपेरीमेंटल लर्निंग संकल्पनेचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी मायक्रो प्रकल्प अनिवार्य.
तसेच विद्यार्थ्यांसाठी ६ आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण (Internship) अनिवार्य आहे.
प्रवेशासाठी अर्ज भरण्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे.
कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.
कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे प्रक्रियेस सुरवात.