साहित्य संमेलनात इंग्लडचा पाहुणा! 

साहित्य संमेलनात इंग्लडचा पाहुणा! 

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली -  साहित्य संमेलन म्हणजे मराठीचा जागर, सारस्वतांचा मेळा, असे म्हटले जाते. 90 व्या साहित्य संमेलनात एक इंग्रज, इंग्लंडचा पाहुणा जॉन गोल्टन आला. नुसता आला नाही तर हा "फेस्टिव्हल' पाहून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रियाही जॉनने दिली. डोंबिवलीचे रहिवासी कौशिक लेले यांच्याकडून दीड वर्षापासून जॉन मराठीचे धडे गिरवत आहे. 

लोकमान्य टिळकांकडे एका इंग्रजाने मराठी शिकण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र मराठी शिकणे अवघड आहे, असे सांगूनही त्याने शिकण्याची जिद्द कायम ठेवली होती. अशीच जिद्द जॉन गोल्टन याने दाखवत मराठी शिकण्यास सुरवात केली. तीही नेटवरून. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाला जॉन हजर झाला. मागील दीड वर्षापासून तो नेटवरून लेले यांच्याकडून मराठी शिकत आहे. मराठी लिपी, भाषा बोलण्याची कला यू-ट्यूबच्या माध्यमातून त्यांचे उच्चार करणेही तो शिकला आहे. 2003 मध्ये तो पहिल्यांदा भारतात आला होता. त्या वेळी तो तमिळनाडूमध्ये इंग्रजीचा शिक्षक म्हणून आला होता. 2006 मध्ये जॉनला राजस्थानमध्ये एका एनजीओच्या कामासाठी आला होता. तिथे तो हिंदी शिकला. हिंदीसाठी खूप पुस्तके आहेत, परंतु मराठी शिकण्यास अनेक अडचणी येत असल्याचे त्याने सांगितले. साहित्य संमेलनामुळे जॉन खूप प्रभावित झाला. येथील ग्रंथदालन पाहूनही त्याला आनंद झाला. जॉनला मराठीसह हिंदी, फ्रेंच व काहीशी इटालियन भाषा येते. 

लेलेंची ऑनलाइन शिकवणी 
नोकरीच्या निमित्ताने संपर्कात येणाऱ्या अमराठी व परदेशी सहकाऱ्यांना कौशिक लेले यांनी मराठी शिकवायला सुरू केले. कालांतराने त्यांनी ही शिकवणी ऑनलाइन सुरू केली. वर्तमान काळातील वाक्‍यरचनेपासून व्याकरणातील अनेक बारकावे ते नेटवरील आपल्या ब्लॉगमध्ये शिकवतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com