
Gadchiroli Lightning: लग्न समारंभावरुन घरी परतताना भीषण दुर्घटना; वीज पडून अख्ख कुटुंबच संपलं!
गडचिरोली : वीज पडून एकाच कुटुंबातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी हा प्रकार घडला आहे. लग्न समारंभावरुन घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. (Entire family of four people killed due to lightning at Gadchiroli Maharashtra)
सुत्रांच्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज-कुरखेडा मार्गावर वीज पडून एकाच कुटुंबातील चौघांचा काल मृत्यू झाला. चालत्या मोटारसायकलवर वीज पडून पती-पत्नीसह दोन छोट्या मुली जागीच ठार झाल्या आहेत.
देसाईगंज तालुक्यातील, आमगाव इथलं हे कुटुंब तळेगावला एका कार्यक्रमासाठी मोटारसायकलनं गेलं होतं. कार्यक्रम आटोपून परत येत असताना आकाशात ढग दाटून आल्यानं जोरदार वीजांचा कडकडाट सुरु होता, त्याचवेळी त्यांच्या मोटारसायकलवर वीज कोसळली, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.