सिंधुदुर्गातून गोव्यात जाणार असाल तर कडक तपासणी होणार

तेथून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल
सिंधुदुर्गातून गोव्यात जाणार असाल तर कडक तपासणी होणार

पणजी : सिंधुदुर्गातून (sindhudurg) गोव्यात (goa) येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM pramod sawant) यांनी येथे दिली. तेथून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

गोव्यातील काहींना डेल्टा विषाणूचा (delta plus) संसर्ग झाला होता ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, कणकवली येथे एका व्यक्तीला डेल्टा प्लस या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गोवा सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सीमेवर कडक स्क्रिनिंग केले जाईल. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल.

सिंधुदुर्गातून गोव्यात जाणार असाल तर कडक तपासणी होणार
तिवरे धरणग्रस्तांच्या घरात अंधार ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com