पर्यावरण संतुलित विकास हेच महात्मा फुले व्हिजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

वारणावती - राज्यातील सर्व कुटुंबांना समान पाणीवाटप करून, सुखी, समृद्धी पर्यावरण संतुलित विकासाचे धोरण म्हणजेच महात्मा फुले व्हिजन होय. जोपर्यंत हे व्हिजन राज्यात लागू होत नाही, तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहील, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. 

मणदूर (ता. शिराळा) येथील हुतात्मा स्मारक येथे सुरू असलेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी डॉ. पाटणकर बोलत होते. 

ते म्हणाले, ""स्थानिक व बाहेरील पाण्याचा एकत्रित वापर करून, जलयुक्त शिवारातील खड्डे भरता आले, पाण्याचा सुयोग्य वापर झाला, तर कोट्यवधी रुपयांचा दुष्काळावर होणार खर्च वाचेल आणि शेतकरी समृद्ध आणि समाधानी होईल. त्याला रोजंदारीसाठी शहरात जावे लागणार नाही. शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. गरीब जनता व शेतकरी वर्गांनाच यांचा तोटा सहन करावा लागला.'' 

या बंदीत 10 टक्केसुद्धा काळा पैसा बाहेर निघाला नाही. शासनाने शेतकऱ्यांची कर्जे रद्द करावीत. दरम्यान, माळवाडी येथील घटनेचा निषेध करून तसेच अधिवेशनानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटणकर यांनी सांगितले. 

Web Title: Environmental Vision Balanced Mahatma phule vision