Valentine's Day; जितेंद्र आव्हाडांची 'लव्ह स्टोरी'

बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

राजकारणी म्हटले की प्रेम, व्हॅलेंटाईन डे याबद्दल बोलतील याची शक्यता जरा कमीच असते. कारण त्यांची गंभीर आणि कणखर प्रतिमाच सहसा आपल्यासमोर जास्त उभी राहीली असते. त्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सारखं नाव घेतलं की थेट आणि गंभीर विषयांवर बोलणारे राजकारणी प्रेमाच्या गप्पा शेअर करतील याची शक्यता जरा कमीच वाटेल, नाही का... अहो, पण त्यांच्या आयुष्यातल्या प्रेमाच्या गोष्टी त्यांनी 'व्हॅलेटाईन डे' निमित्त 'ई सकाळ' सोबत बिनधास्त शेअर केल्या आहेत. कसा आहे त्यांच्या आयुष्यातला प्रेमाचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात..

राजकारणी म्हटले की प्रेम, व्हॅलेंटाईन डे याबद्दल बोलतील याची शक्यता जरा कमीच असते. कारण त्यांची गंभीर आणि कणखर प्रतिमाच सहसा आपल्यासमोर जास्त उभी राहीली असते. त्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सारखं नाव घेतलं की थेट आणि गंभीर विषयांवर बोलणारे राजकारणी प्रेमाच्या गप्पा शेअर करतील याची शक्यता जरा कमीच वाटेल, नाही का... अहो, पण त्यांच्या आयुष्यातल्या प्रेमाच्या गोष्टी त्यांनी 'व्हॅलेटाईन डे' निमित्त 'ई सकाळ' सोबत बिनधास्त शेअर केल्या आहेत. कसा आहे त्यांच्या आयुष्यातला प्रेमाचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात...

ऋता आणि माझं लव्ह मॅरेज. 1982 साली लोकसभा निवडणुकांवेळी ऋताच्या वडलांच्या प्रचारादरम्यान ठाण्यात आमची ओळख झाली. आमचं दोघांचं कॉलेज वेगळं, ती मुंबईला मी ठाण्यात पण ही ओळख वाढत गेली. आम्ही प्रपोज केल्याचं आठवत नाही. सहवासातून आमचं प्रेम वाढत गेलं. 1986 ला तिला एअर होस्टेसची चांगली नोकरी लागली. मी मात्र 'स्ट्रगल' करत होतो. त्या काळात आम्ही सोबत पाहिलेल्या सगळ्या सिनेमाची तिकिटं तिनेच काढल्याचं आठवतं. 1988 ला मलाही नोकरी मिळाली आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.

Jitendra Awhad

आमचा आंतरजातीय विवाह. आमच्या दोघांच्याही घरच्यांना जातीचा प्रचंड अभिमान होता. त्यामुळे आमच्या लग्नाला सुरवातीला बराच विरोध झाला. पण नंतर आम्ही लग्न करण्याबाबत ठाम असल्याने हा विरोध मावळला आणि 1993 साली अगदी सध्या पद्धतीने आमचं लग्न झालं.

Jitendra Awhad

पूर्णवेळ राजकारणात यायचं असं माझं काही ठरलेलं नव्हतं. 1996 पासून मी राजकारणात सक्रिय झालो. माझा राजकारणात येण्याला ऋताचा तसा कधी विरोध नव्हता. तिने बाकी गोष्टींची जबाबदारी उचलल्यामुळे मला राजकारणाकडे लक्ष देता आलं. 2011 ला तिने नोकरी सोडली आणि तेव्हापासून ती  माझ्या मदतीला आली. आज माझ्या मतदारसंघाचा अर्धाधिक भार तीच सांभाळते. त्यामुळे मी बाहेर राज्यभर फिरू शकतो. 

व्हॅलेंटाईन डे
खरंतर मला आयुष्यभर व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागला.
त्याकाळी शिवसेनेचा या डेज् ला विरोध होता. आम्ही मात्र हा विरोध मोडुन काढण्यासाठी आठवडाभर तरुणांसाठी दुकान लावायचो, त्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी 
प्रोत्साहन द्यायचो. त्यामुळे मी हा दिवस बराच 'एन्जॉय' केला आहे, असे मला वाटते.

आजची पिढी प्रेमाबाबत समजदार
आताच्या तरुणांमध्ये प्रेमाबाबत समजदारपणा दिसुन येतो. पुर्वीसारखा विरोध आज प्रेमाला होत नाही. आमच्या वेळी 'व्हॅलेंटाईन डे' आतासारखे साजरे केले जात नव्हते. मोबाईल सारखी संपर्काची साधने नव्हती. आज मोबाईल असेल किंवा सोशल मिडीया यामुळे संवाद वाढला आहे. त्यामुळे 'कम्युनिकेशन गॅप' आता कमी झाला आहे.

Valentine's Day स्पेशल :
व्हॅलेंटाईन डे स्पेशल; अभिनेत्री मृणाल दुसानिस सांगतेय लग्नानंतरची लव्ह स्टोरी...

पहिलं प्रेम नेहमीच का फसतं..?

'व्हेलेंटाईन डे'निमित्त प्रियाचा नवा व्हिडिओ पहा

Web Title: esakal marathi news jitendra awhad love story valentines day