#स्पर्धापरीक्षा - कॅग अहवाल (महाराष्ट्राची आर्थिक प्रगती)  

टीम ई सकाळ
शुक्रवार, 7 जुलै 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत.

दि. 15 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या कॅगच्या अहवालात (Comptroller and Auditor General) प्रगतिशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची प्रगती खुंटली असल्याचा निष्कर्ष कॅगने काढला आहे. 

  • कॅगच्या अहवालात 2005 ते 2015 या दहा वर्षांच्या कालावधीचा राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. 
  • 2005 ते 2015 या कालावधीत ज्या प्रमाणात राज्याची लोकसंख्या वाढली, त्या प्रमाणात आर्थिक प्रगती झाली नसल्याचा उल्लेख कॅग अहवालात आहे. 
  • 2005 ते 2015 या काळात भारतातील राज्यांचा सकल उत्पादन वाढीचा दर 15.44% इतका होता तर त्याच कालावधीत महाराष्ट्राचा सकल उत्पादन वाढीचा दर 14.81% इतका राहिला. या अर्थाने महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षांत कमी आर्थिक प्रगती केल्याचे कॅगने नमूद केले आहे. 
  • 2011 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या 'एकूण स्थूल उत्पादन' (जीडीपी) वाढीच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे कॅगच्या अहवालात नोंदवले गेले आहे. 
  • 2010-2011 मध्ये राज्याचा जीडीपी वाढीचा दर 22.60% होता तर 2014-2015 मध्ये हाच दर 11.69% इतका घसरल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General) 
भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या यंत्रणेची निर्मिती केली गेली आहे. कॅग - कर्तव्य आणि अधिकार 1976 या कायद्यानुसार कॅगला लेखापरीक्षणाचे काम करावे लागते. 

  • केंद्र सरकार तसेच देशातील सर्व राज्य सरकारे आणि जेथे विधानसभा आहे, अशा राज्य सरकारच्या संचित निधीतून झालेला खर्च हा कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे झाला आहे की नाही, हे तपासण्याचे काम 'कॅग' करते. 
  • केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या संस्थांना, महामंडळांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करत असते. अशा संस्थांचा व्यय-अव्यय तपासून त्याचा अहवाल तयार करते. 
  • स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उद्योग तसेच सार्वजनिक उद्योगांतील गुंतवणूक - निर्गुंतवणूक व्यवहारांची तपासणी करून अहवाल तयार करते. 
  • केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध मंत्रालयांनी / खात्यांनी केलेले व्यवहार जमा-खर्च तसेच आकस्मिक निधीतून झालेला खर्च या सर्वांची तपासणी आणि अहवाल तयार करण्याचे काम 'कॅग' करते. 
  • सध्या भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) शशिकांत शर्मा आहेत. या आधीचे कॅग विनोद रॉय मे 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर शशिकांत शर्मा हे भारताच्या कॅगपदी आले. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - लिंक्‍ड इन (LinkedIn)

#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

Web Title: esakal news competitive exam series upsc mpsc CAG report maharashtra