#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु

INS Tihayu
INS Tihayu

भारताच्या तीन बाजूंनी समुद्र किनारा आहे. साहजिकच दहशतवाद्यांपासून किंवा चाचेगिरी आणि तस्करी करणाऱ्यांपासून देशाचे संरक्षण करून संभाव्य वित्त आणि प्राणहानी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. मुंबईला 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर सागरीमार्गावर अधिक कार्यक्षम आणि प्रभावी टेहळणी करणारी यंत्रणा असणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी नौदलाने काही खबरदारी घेतली आहे. देशाच्या नाविकदलाकडे विमानवाहू जहाज, क्रूजर्स, विध्वसंक, फ्रिगेट्‌स, पाणबुडी, कोर्व्हेटस आदी प्रकारची जहाजे असतात. तथापि भारताच्या किनाऱ्याची टेहळणी आणि संरक्षण करण्यासाठी तटरक्षक युद्धनौका किंवा योग्य त्या कार्यक्षमतेच्या बोटी असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, चाचेगिरी करणारे किंवा दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तीव्र आक्रमण जलयान आवश्‍यक ठरतं, याला फास्ट अटॅक क्राफ्ट म्हणतात. 

नाविक दलाला गरज असलेल्या सर्व प्रकारच्या नौका-जहाजे बांधण्याची जबाबदारी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जी आर एस ई, कोलकाता) यांच्याकडे आहे. आता पर्यंत त्यांनी 94 जहाजे बांधलेली आहेत. आता भारताच्या नौदलासाठी तिहायु नावाचे तटरक्षक जहाज 30 ऑगस्ट 2016 रोजी सुपूर्द केले आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढलेली आहे. निकोबार जवळील तिहायु (कटचल) नावाच्या एका बेटाचे नाव या जहाजाला दिलेलं आहे. याला तांत्रिक भाषेत वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट म्हणतात. पूर्व किनाऱ्यावर इस्टर्न नेव्हल कमांडकडे (विशाखापट्टणम्‌) 19 ऑक्‍टोबर 2016 रोजी तिहायु तैनात करण्यात आली. तिहायुचे मरीन डिझेल इंजिन हे तीन (हॅमिल्टन) वॉटर जेट प्रॉप्युल्जन तंत्रावर आधारलेले आहे. ते 2720 किलोवॉट शक्ती (पॉवर) निर्माण करते. तिहायुवर सहा अधिकाऱ्यांसह 29 कर्मचारी कार्यरत असतात. 

तिहायुवर 30 मिलिमीटरची (सी आर एन) गन, अत्याधुनिक रडार आणि संदेशवहनाची व्यवस्था आहे. तिहायुचे उपयोग महत्त्वाचे आहेत (1) टेहळणी आणि गस्त (2) चाचेगिरी (लुटेरे) आणि दहशतवादी यांच्यावर देखरेख आणि बीमोड (3) मच्छीमारांना संरक्षण (4) बचाव कार्य (5) एक्‍सक्‍ल्‌युसिव्ह इकॉनॉमिक झोनचे संरक्षण. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com