#स्पर्धापरीक्षा - कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प

BARC
BARC

कुडनकुलम आण्विक केंद्राचे उद्‌घाटन 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दि. 10 ऑगस्ट 2016 रोजी कुडनकुलम आण्विक ऊर्जा केंद्राचे एकाच वेळी उद्‌घाटन केले. पुतीन मॉस्कोमधून, नरेंद्र मोदी दिल्लीतून आणि स्व. जयललिता चेन्नईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र आले. 

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प
"कुडनकुलम' हा प्रकल्प भारतातील तमिळनाडूतील तिरुनेवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे उभारला. अणुशक्तीपासून ऊर्जानिर्मितीसाठी कुडनकुलम प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि तेव्हाच्या सोव्हिएत महासंघाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात 20 नोव्हेंबर 1988 रोजी करार झाला होता. मात्र, सोव्हिएत महासंघातील आर्थिक व राजकीय घडामोडींमुळे पुढे दहा वर्षे या कराराबाबत काहीच घडले नाही. या काळात 1991 मध्ये सोव्हिएत महासंघाचे विभाजन झाले नंतर अमेरिकेने या कराराला आक्षेप घेतला. अणुइंधन पुरविणाऱ्या देशांच्या गटात 1992 मध्ये झालेल्या कराराशी भारत- रशिया करार सुसंगत नसल्याचा अमेरिकेचा दावा होता. शेवटी 31 मार्च 2002 रोजी या प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. 

  • प्रकल्पाची एकूण ऊर्जानिर्मिती क्षमता 9,200 मेगावॉट आहे. या प्रकल्पात 1,200 मेगावॉट क्षमतेच्या सहा आणि एक हजार मेगावॉट क्षमतेच्या दोन अणुभट्टया बांधण्याचे ठरवले आहे. 
  • या प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यांचा प्रस्तावित खर्च 13 हजार 171 कोटी रुपये होता. मात्र, विलंब झाल्याने ही रक्कम वाढून 17 हजार 270 कोटींच्या घरात गेली. 
  • 10 डिसेंबर 2014 रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वीजनिर्मिती सुरू झाली आणि 10 ऑगस्ट 2016 ला या प्रकल्पाचे औपचारिक उद्‌घाटन कण्यात आले. या युनिटची क्षमता 1,000 मेगावॉट इतकी आहे. 
  • या प्रकल्पातील रिऍक्‍टर  हे भारतीय अणुऊर्जा महामंडळ व रशियाचे ऍटोम्स्ट्रोयक्‍सपोर्ट कंपनीच्या  रोस्टॉम या उपकंपनीच्या मदतीने बनवले गेले आहे. 
  • या अणुऊर्जा प्रकल्पातील दुसरे युनिट ऑगस्ट 2016 च्या अखेरपर्यंत पूर्णपणे वीजनिर्मिती करण्यास सज्ज होईल. 
  • याशिवाय या प्रकल्पातील तिसरे आणि चौथे युनिट उभारणीसाठीचे काम कुडनकुलम येथे सुरू आहे. 2022 पर्यंत हे संचही कार्यरत होतील. 
  • जपानमधील अणू अपघातानंतर कुडनकुलम येथे अशा अपघातापासून बचावासाठीची सुरक्षा उदा. वॉटर मॉडरेटेड रिऍक्‍टर कॉम्प्लेक्‍स अशी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. 
  • या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटपासून तयार होणारी ऊर्जा तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पद्दुचेरी या राज्यांना पुरविण्यात येणार आहे. 

भारतातील अणुऊर्जा कार्यक्रम 

  • भारतात अणुशक्ती निर्माण करण्यासाठी युरेनियम, थोरिअम, लिथियम, प्लॅटिनियम यांसारख्या आण्विक इंधनांचा वापर केला जातो. 
  • भारतात युरेनियम झारखंड, हिमालयाचा काही भाग राजस्थान, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळते. 
  • थोरिअम, केरळ आणि तमिळनाडू किनाऱ्यावरील मोनाझाइट प्रकारच्या वाळूमध्ये थोरिअम सापडते. हा जगातील एक समृद्ध थोरिअमचा साठा समजला जातो. 
  • देशात झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशातील अभ्रकाच्या पट्टयात लिथियमचे साठे आहेत. 
  • भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम हा "शांततेसाठी अणू' या तत्त्वावर आधारित आहे. 
  • 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना झाली. डॉ. होमी जहांगीर भाभा हे या महामंडळाचे पहिले अध्यक्ष होत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com