भिडे,एकबोटेंना अजूनही अटक का नाही?- प्रकाश आंबेडकर

गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई- कालचा 'महाराष्ट्र बंद' कुठल्याही एक समाज, संघटनेपुरता मर्यादीत नव्हता. हे आंदोलन फक्त दलितांचे नव्हते तर जे बारा बलुतेदार होते त्यांचा ही सहभाग होता आणि सरकारने हे मान्य केलं आहे असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज(गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

कोरेगाव भिमा दंगली प्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या. राज्यात अनेक ठिकाणी सुरु असलेले कोम्बींग ऑपरेशन बंद करण्याची, दंगलीचा आरोप असलेले संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांच्यावर लवकर कारवाई करण्याची तसेच या घटनेची चौकशी करणाऱ्यांना crpc चा अधिकार देण्याची मागणी यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सकाळी 11 वाजता आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अनेक पक्षाचे नेते यावेळी सोबत होते. कालच्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील तणाव निवळला आहे पण त्यावर आमचं नियंत्रण कायम राहीलच असं नाही त्यामुळे सरकारने आम्हाला दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी आणि दोषींना अटक करावी. गु्न्हा दाखल करुन दोन दिवस होत आले तरी अजुनही भिडे, एकबोटेंना अटक का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

तसेच संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कुणी मोर्चा काढत असतील तर त्यांना मोर्चा-आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भीडे यांचा कोणताही कार्यक्रम असेल तर तो आम्ही उधळणार नाही कारण आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य मानतो, पोलिसांनी त्यांचं काम करावं असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Web Title: esakal news koregaon bhima prakash ambedkar