महाराष्ट्रात दिवसभर संततधार...

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

आज दिवसभरातील राज्यातील विविध ठिकाणची पावसाची स्थिती व संबंधित बातम्या...

पावसाने कल्याण-नगर मार्गावर तीन तास वाहतूक कोंडी
कल्याण-नगर महामार्गावरील शहाड अंबिका नगर ते वरप गाव परिसरामधील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पावसाचे साठलेल्या पाण्यामुळे आज (मंगळवार) सकाळी तब्बल तीन तासाहुन अधिक काळ वाहनाची लांबलचक रांगा लागल्याने नागरिकांना, विद्यार्थी वर्गाला पाण्यामधून वाट काढत घर गाठावे लागले. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
पूर्ण बातमी इथे वाचा

मुरबाडमध्ये संततधार; गावांत पाणी घुसण्याची भीती
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून सह्याद्री पर्वत रांगेत जोरदार पाऊस पडत असल्याने बारवी धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सिंधुदुर्गात मुसळधार...! रस्त्यावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. संततधारेमुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत झाल्याचे प्रकारही घडले.
पूर्ण बातमी इथे वाचा

मंडणगडातील चार धरणे 'ओव्हरफ्लो'; दिवसभरात ११४ मिमी पाऊस
तालुक्यात दमदार पाऊस सुरु असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तालुक्यात पावसाची कोसळधार सुरु असून आत्तापर्यंत १६८१ मिमी पाऊस पडला आहे. मंगळवारी ता:१८ रोजी ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

माणिकडोह धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील शहाजीसागर जलाशयातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षी पेक्षा भरीव वाढ झाली असल्याचे शाखा अभियंता काशिनाथ देवकर यांनी सांगितले.
पूर्ण बातमी इथे वाचा

कऱ्हाड व पाटण तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु
कऱ्हाड व पाटण तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून, पिकांसाठी जीवदान देणारा ठरला आहे. तालुक्यात पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

रत्नागिरी जिल्ह्यातील 63 पैकी 28 धरणे भरली
पावसाचा लपंडाव सध्या जिल्ह्यात सुरूच आहे. मात्र असे असले तरी यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. 63 पैकी तब्बल 28 धरणे १०० टक्के भरली आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

वरसगाव धरणातील लवासा दासवे तलाव भरला
वरसगाव धरणातील लवासा दासवे येथील तलाव पावसाने पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती लवासा व खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

पाच दिवसांत चार धरणांतील पाणीसाठा साडेपाच टीएमसीने वाढला
मागील पाच दिवसापासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून १३ जुलैपासून आज मंगळवार सकाळपर्यंत चार धरणांतील पाणीसाठा देखील साडेपाच टीएमसीने वाढला आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

Web Title: esakal news sakal news maharashtra news rain news monsoon news