रामदास कदमांपुढे इतर मंत्र्यांची बोलती बंद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे ही बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांचा रूद्रावतार बघून अन्य मंत्र्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. 

मुंबई : गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रुद्रावतार धारण केला.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे ही बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांचा रूद्रावतार बघून अन्य मंत्र्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. 
रागाच्या भरात पर्यावरणमंत्री कदम यांनी स्वपक्षाच्या मंत्र्याकडे असलेल्या समृद्धी कॅरिडोरचेही देखील वाभाडे काढले.

Web Title: Esakal news sakal news ramdas kadam shivsena news