या आठवड्यातील टॉप 5 व्हिडीओ ; तुम्ही पाहिलेत का?

टीम ई सकाळ
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

या आठवड्यातील ई सकाळ वरील टॉप 5 व्हिडीओ- 

  • सिंधूदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळून दोघा तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेचे Live चित्रण व्हायरल झाले.

  • वाहतूक पोलिसाला वाहन चालकाची मारहाण
    नागपूर : अमय मारावार या वाहन चालकाने संदीप इंगोले या वाहतूक पोलिसांच्या कानशीलात लगावली; संविधान चौकातील घटना; हेल्मेट करवाई सुरु असताना थांबविण्याचा प्रयन्त केला असता पोलिसांच्या अंगावर नेली दुचाकी.

  • खडकवासला धरणातून मुठा नदीत 9416 क्यूसेक पाणी सोडल्याने नांदेड-शिवणे पुलावरून दोन फूट उंचावरून जात असताना एक दुचाकी चालक त्या पुलावरून जात होता. शेवटचे काही अंतर राहिले असताना पाण्याचा जोर वाढल्याने दुचाकी वाहुन गेली. 

  • आंबोलीच्या दरीत कोसळलेल्या दोघा तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून काढण्यात आले.

  • श्रीलंकेत सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील शतकवीर Ajinkya Rahane याने Sunandan Lele यांच्या प्रश्नावर मराठीत काय उत्तर दिलं...?

Web Title: esakal news sakal news top 5 video of week

टॅग्स