स्नेहवनात त्या दोघांनी 25 मुलांसाठी उभारलं घरटं!

गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

प्रेम हे किती निस्वार्थ आणि शुध्द असू शकतं याचा प्रत्यय आपल्याला देशमाने दांम्पत्याच्या कार्यातून येईल. या मुलांना जे प्रेम हे दांम्पत्य देत आहे अशा प्रकारच्या प्रेमाची गरज खऱया अर्थाने आजच्या जगात आहे हे दिसून येतं. दुसऱ्याच्या आनंदासाठी आणि मदतीसाठी केलेल्या समर्पणात असलेेलं हे निर्मळ प्रेम 'व्हॅलेंटाईन डे'ला सार्थ ठरवणारं आहे.  

अशोक देशमाने या उच्चशिक्षित तरुणाने आयटी क्षेत्रातील उत्तम पगाराची नोकरी सोडून दोन वर्षांपूर्वी स्नेहवन ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार, नंदीसमाज यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाचे काम केले जाते. बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत अशोक देशमाने यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी अर्चना देशमाने यादेखील ही जबाबदारी तितकंच मन लावुन सांभाळताना दिसतात. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने या जोडीसोबत 'ई सकाळ'ने संवाद साधला. 
'स्नेहवन' मध्ये 'व्हॅलेंटाईन डे' (व्हिडीओ)

व्हॅलेंटाईन डे म्हटला की स्त्री पुरुषातलं प्रेम याचाच विचार आपल्या डोक्यात  सगळ्यात आधी येतो. पण प्रेम हे किती निस्वार्थ आणि शुध्द असू शकतं याचा प्रत्यय आपल्याला देशमाने दांम्पत्याच्या कार्यातून येईल. या मुलांना जे प्रेम हे दांम्पत्य देत आहे अशा प्रकारच्या प्रेमाची गरज खऱया अर्थाने आजच्या जगात आहे हे दिसून येतं. दुसऱ्याच्या आनंदासाठी आणि मदतीसाठी केलेल्या समर्पणात असलेेलं हे निर्मळ प्रेम 'व्हॅलेंटाईन डे'ला सार्थ ठरवणारं आहे.  

Image may contain: 2 people, people smiling, people sitting

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 25 मुलं स्नेहवन मध्ये राहतात. त्यांच्या शिक्षणाची पुर्ण जबाबदारी अशोक देशमाने यांनी स्विकारली आहे. यासोबतच शेजारी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या 25 मुलींच्या शिक्षणाचीही जबाबदारी अशोक देशमाने यांनी घेतली आहे.

Snehwan

या 25 मुलांसोबतच हे दोघं 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करतात. 'समाजाला आपण जे देतो, जे कायमस्वरुपी एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवेल तेच खरं प्रेम. स्नेहवन म्हणजेच फॉरेस्ट ऑफ लव्ह. हेच प्रेम आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे', असे अशोक देशमाने सांगतात.

या त्यांच्या जगाला प्रेम देण्याच्या कामात आपणही आपले प्रेम देऊन या निस्वार्थ कार्याला हातभार लावू इच्छिता? या 25 मुलांचे आणि मुलींचे शिक्षण, आरोग्य यासाठी काही आर्थिक मदतीची आज 'स्नेहवन'ला गरज आहे. स्वेच्छेने आपण मदतीसाठी 8237277615 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.   

Image may contain: 1
 

Web Title: esakal valentine day snehwan ashok deshmane story children