उमेदवार भरती महाराष्ट्रात; परीक्षा केंद्र मात्र नोएडात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

नाशिक - कर्मचारी राज्य बिमा निगमतर्फे (इएसआयसी) राज्यातील इएसआयसी हॉस्पिटल्समधील विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी येत्या मंगळवारी (ता.२६) लेखी परीक्षेसंदर्भातील हॉलतिकीट परीक्षार्थी उमेदवारांच्या हाती पडल्यानंतर सारेच अवाक्‌ झाले आहेत. 

रिक्त जागा या महाराष्ट्रातील असताना आणि परीक्षार्थींनी ऑनलाइन अर्ज करताना त्यांच्या सोयीनुसार दोन परीक्षा केंद्रांची नोंद केलेली होती. तरीही त्यांना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएड हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील इएसआयसी हॉस्पिटल्समध्ये काही पदे रिक्‍त आहेत. अशा १५९ पदांसाठी कर्मचारी राज्य बिमा निगमतर्फे गेल्या डिसेंबर २०१८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली  होती. मात्र, उमेदवारांच्या इ-मेलवर या परीक्षेसंदर्भातील हॉलतिकीटचे मेल धडकले तेव्हा परीक्षा केंद्र दिल्लीनजीकच्या ग्रेटर नोएडा असल्याचे दिसले. त्यामुळे उमेदवारांनी या मेलला उलट मेल पाठवून परीक्षा केंद्र बदलण्याची व ते महाराष्ट्रात कोठेही देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

Web Title: ESIC Hospital Recruitment in maharashtra Exam Center in Noida