"इथेनॉल'च्या स्वतंत्र पंपासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पवार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - देशभरात साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन, आंतरराष्ट्रीय बाजारातील बिकट परिस्थिती व केंद्र सरकारचे निर्यातीबाबतचे जाचक धोरण यामुळे साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी इथेनॉलचे स्वतंत्र पंप स्थापन करण्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.

साखर संघात आज सहकारी व खासगी साखर उद्योगासोबतच साखर आयात-निर्यात करणाऱ्या संस्था संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल पंपाच्या धर्तीवरच देशभरात इथेनॉलचे स्वतंत्र पंप असावेत, ही मागणी केंद्र सरकारला मान्य असून, त्याबाबतच्या निर्णयाचा मानस सुरू झाला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. पुढील दोन वर्षांत या पाठपुराव्याला यश येण्याची शक्‍यताही पवार यांनी व्यक्त केली. 

Web Title: ethanol separate pumps