Bachchu Kadu: "सरकार पडल तरी चालेल...असं का म्हणाले बच्चू कडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu

Bachchu Kadu: "सरकार पडल तरी चालेल...असं का म्हणाले बच्चू कडू

Bachchu Kadu: एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार पुन्हा एकदा 21 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. ही माहिती शिंदे सरकार मधील समर्थक आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. ते अमरावतीमध्ये बोलताना म्हणाले "मी पण गुहाटीला जाणार आहे. आम्ही सर्वांनी मिळून कामख्या देवीला नवस केला होता सरकार यावं म्हणून आणि तो नवस पुर्ण झाला म्हणून आम्ही पुन्हा कामख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे"

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारलं असता ते म्हणाले "सरकार पडल तरी चालेल मात्र शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे, दिव्यांग शेतकरी यांचं कल्याण झालं पाहिजे"

त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्या "शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही" या टीकेवर टीका केली आहे. ते म्हणाले "हे सगळ मूर्ख बनवण्याचं काम आहे. आम्ही पण असंच म्हणत होतो सरकार पडलं पाहिजे. या सगळ्या भूलथापा आहेत. आमदार फूटू नये यासाठी संजय राऊत अशी वक्तव्य करत आहेत." अस मत त्यांनी व्यक्त केलं.

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील ५० खोकेच्या वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा टाकला पडला होता. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.