पालघर, गोंदियात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

भंडारा-गोंदियातही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. जवळपास 35 केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याठिकाणावरील मतदान रद्द करण्यात येणार नसल्याचे निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले. 

मुंबई : आज (सोमवार) पालघर आणि भंडारा-गोंदियात होत असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अनेक मतदान केंद्रांवर पहायला मिळाले. त्यामुळे मतदांरांना ईव्हीएमची दुरुस्ती होईपर्यंत प्रतीक्षेत थांबावे लागले.

शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनचा सावळा गोंधळ सुरूच आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण मतदारसंघात 80 ते 90 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले. सायवन, कुडे, तारापूरमध्ये जवळपास अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं. निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी मशीन बदलण्याचे काम सुरू होते. झालेल्या सदर घोळामुळे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झालंय का घोळ झालंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर दुसरीकडे यादीतल्या घोळामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. पालघरमधले रहिवासी असूनही मतदार यादीत नाव नसणे, दुसऱ्यात मतदारसंघात नाव जाणे, पत्ता चुकीचा दाखवणे असे अनेक प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अनेक ठिकाणी मतदानादरम्यान लाईट गेल्याने अंधारातच मतदान करण्याची वेळ मतदारांवर ओढवली आहे

भंडारा-गोंदियातही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. जवळपास 35 केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याठिकाणावरील मतदान रद्द करण्यात येणार नसल्याचे निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले. 

Web Title: EVM fault in Palghar, Gondia