Vidhan Sabha 2019 : काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही ईव्हीएमची भिती; कार्यकर्त्यांना दिलेत 'हे'आदेश

EVM fears Shiv Sena along with Congress NCP
EVM fears Shiv Sena along with Congress NCP

मुंबई : विधानसभेसाठी उद्या राज्यातील 288 मतदार संघात मतदान होत असून ईव्हीएमवर डोळ्यात तेल ठेवून पाळत ठेवण्याचे आदेश काॅग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनं कार्यकर्त्यांना दिले आहेत.

उद्या सकाळी मतदानाच्या अगोदर सर्व पक्षाच्या मतदान केंद्रावरील प्रतिनिधी समोर ईव्हीएमची तपासणी चाचणी करण्यात येईल. यावेळी प्रत्येक ईव्हीएममध्ये तपासणी करताना 35 ते 40 मते टाकून चाचणी करण्याचे आदेश शिवसेनेनं गटप्रमुखांना दिले आहेत. मतदान अधिकार्याच्या विनंतीनुसार प्रत्येकी पाच पाच मते टाकून ईव्हीएमची चाचणी करण्यात येते. मात्र शिवसेनेच्या प्रतिनिधींनी किमान 35 ते 40 मते टाकून मतांची बेरीज व पक्षचिन्हाला पडणारी मते यांची चाचणी घ्यावी. असे स्पष्ट आदेश शिवसेनेकडून गटप्रमुखांना देण्यात आले आहेत. 

राष्ट्रवादी काॅग्रेसनं सर्व मतदान केंद्रावर मोबाईल नेटवर्क बंद करण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे नेटवर्क चालू राहता कामा नये अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. 

काॅग्रेसच्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएमवर कडा पहारा ठेवण्याची तयारी केली आहे. मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम सील करून ज्याठिकाणी ठेवण्यात येतील तिथे मतमोजणीपर्यंत पहारा देण्याची तयारी काॅग्रेसनं केली आहे. या सर्व दक्षतेमुळं या तीन्ही राजकिय पक्षात ईव्हीएमची धास्ती असल्याचेच चित्र आहे. 

दरम्यान, उद्या चे मतदान सर्वत्र शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com