राज्यभर ‘व्हीव्हीपॅट’चा जागर!

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई - ईव्हीएम यंत्राबाबत असलेल्या शंका, आक्षेपांना राज्यातील सर्व तालुक्‍यांत जाऊन निवडणूक आयोग उत्तर देणार आहे. यासाठी पुढील ५० दिवस राज्यातील ३५३ तालुक्‍यांत ‘व्हीव्हीपॅट’चा जागर करणारी वाहने धावणार आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी - कर्मचारी सुमारे दोन महिने राज्यभर प्रत्येक तालुक्‍यात जाऊन नागरिकांच्या विविध शंकांचे समाधान करणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी यांना पत्रे धाडली आहेत.

ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मतदानावर मागील काही निवडणुकांनंतर विविध स्तरांवर आक्षेप घेतले जात आहेत. यामुळे मतदारांच्या मनात शंका निर्माण होऊन अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत. हे सर्व आक्षेप आणि शंका दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून पुढील काळात केला जाणार आहे. मागील चार वर्षांत विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुका, तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुका, यामध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, हॅकच्या तक्रारी, मतदानावेळी एकाच उमेदवाराला मतदान होणे आदी स्वरूपाच्या तक्रारी राजकीय पक्ष, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मतदार यांनी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे मतदान केल्यानंतर ज्या उमेदवाराला मतदान केले त्याच उमेदवाराला मत पडले की नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये मत दिल्याची पावती येते. या व्हीव्हीपॅट यंत्राचा डेमो राज्यभर दाखवला जाणार आहे.

राज्यातील सर्व तालुक्‍यांत निवडणूक आयोगाची वाहने जाणार असून, यामध्ये व्हीव्हीपॅटविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी निवडणूक आयोग भित्तीपत्रके, माहितीची पोस्टर्स वाटणार आहे.

Web Title: EVM machine jagar in maharashtra