Vidhan Sabha 2019 :  भाजपचे माणिकराव कोकाटे ‘राष्ट्रवादी’त

Ex bjp leader Manikrao kokate joins  NCP
Ex bjp leader Manikrao kokate joins NCP

विधानसभा 2019  
मुंबई - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

कोकाटे यांचा यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता विधानसभेसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्याने कोकाटे यांनी राष्ट्रवादीत उडी घेतली आहे. कोकाटे हे १९९९, २००४ आणि २००९ असे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोकाटे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर ते २००९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. राणेंनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर कोकाटे यांनी वेगळा मार्ग निवडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, आमदार किरण पावसकर आदी उपस्थित होते.

नहाटाही राष्ट्रवादीच्या वाटेवर
दरम्यान, नवी मुंबईतील शिवसेनेचे मोठे नेते विजय नहाटादेखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदारसंघ भाजपने स्वतःकडे ठेवल्याने शिवसेनेच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नहाटा नाराज असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com