
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यावर भाष्य करत महाराष्ट्रात खळबळ उडवून देण्याचे काम भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यावर भाष्य करत महाराष्ट्रात खळबळ उडवून देण्याचे काम भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
दरम्यान, सत्ता गेल्यानंतर भाजप पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.
मनसे आमदार उद्धव ठाकरेंना म्हणतात, ‘आता ‘U’ ‘T’urn नको!’
भाजप फक्त ओबीसी नेत्यांना पक्षासाठी, निवडणुकीसाठी वापरून नंतर त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला आहे. भाजपने बहुजन समाजाच्या नेत्यांना खुप त्रास दिला आहे. त्यामुळेच सध्या पंकजा मुंडे यांना भाजप जाणीवपुर्वक त्रास देत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनादेखील पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मंजूर केला होता परंतू, आम्ही सर्वांनी विरोध करत हा ठराव फेटाऴून लावला होता.
शरद पवारांनी सांगितलं, अजित पवार भाजपसोबत का गेले?
पहिल्यापासून भाजप ओबीसी नेत्यांना डावलत आली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव बैठकीत ठेवण्यात आला होता. आम्ही त्या बैठकीत गोपीनाथ मुंडे हे भाजपचा आत्मा आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला तळागाळापर्यंत पोहचवले. त्यांना पक्षातून काढू नये असे मत, मांडून त्या ठरावास कडाडून विरोध केला होता. यावेळी त्या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या असेही आमदार शेंडगे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ''भाजप फक्त बहुजन नेत्यांचा फायदा घेेते, आणि नंतर त्यांना डावलते. याच बाबतीत उदाहरण द्यायचे झाले तर अण्णा डांगे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच माझेही देता येईल. बहूजन समाजातील नेत्यांना वापरून नंतर खड्यासारखे दूर करायचे हे भाजपचे पहिल्यापासून धोरण राहिले आहे. मी पंकजा यांना पक्ष सोड असे म्हणणार नाही, कारण त्या त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत.''