
Exam Result : आयसीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख ठरली; 'या' दिवशी होणार जाहीर
मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (आयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी, 14 मे रोजी दुपारी ३ वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यासाठीची घोषणा आज मंडळाकडून करण्यात आली.
आयसीएसई मार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची( आयसीएसई) परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. तर बारावीची (आयएससी) परीक्षा 13 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ती 31 मार्चपर्यंत चालली होती यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी बारावीची या परीक्षेला देश विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे 2.5 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
दरम्यान, 13 मे रोजी आयसीएसई या मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता होती. त्यासाठी मंडळाकडून संकेत देण्यात आले होते. त्यामुळे दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे शकडो विद्यार्थी या निकालाकडे लक्ष देऊन होते. मात्र दुपारी मंडळाकडून अधिकृतरित्या हा निकाल 14 मे रोजी दुपारी जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले.