अजित पवारांनी दिलेले पत्र अखेर न्यायालयात उघड; पाहा त्यात काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचा मी गटनेता आहे, मला 54 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती राजवट जास्तकाळ चालू नये. यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन कऱण्यासाठी आमंत्रित करावे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित यांनी राज्यपालांना दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले आहे.

महाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर 

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र हे दस्तावेज आज (ता. 25) सकाळी साडेदहा वाजता सादर करण्यात आले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यपाल सचिवालयाचे वकील तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हटले की, राज्यपालांनी तिन्ही पक्षांना बहुमतासाठी संधी दिली. निवडणुकीपूर्वी राज्यपालांना युतीची कल्पना होता. 9 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी वाट पाहिली. तिघांनी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अजित पवारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रावर 54 आमदारांच्या सह्या आहेत. ते 22 नोव्हेंबरला पत्र दिले होते आणि गटनेता म्हणून त्यावर अजित पवारांचे नाव होते.

भाजपवाल्यांनो सावधान! काँग्रेसचा चाणक्य येतोय...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explanation on Letter of NCP MLA support from Ajit Pawar in the Court