अतिरिक्‍त साखरेवर इथेनॉलची ‘मात्रा’

अनिल सावळे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात पाच लाख टनांनी घट होणार आहे. परिणामी, अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल, अशी अपेक्षा आहे. 

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपग्रहांच्या मदतीने छायाचित्रे घेण्यात आली. त्यानुसार ‘इस्मा’ने चालू हंगामात शेतातील उसाचे क्षेत्र आणि साखरेच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्‍त केला आहे. 

महाराष्ट्रात यंदा २० जानेवारीअखेर ५६८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ६०.८२ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. ‘इस्मा’च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात यंदा ९५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०७.२३ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ३८२ लाख टन उसाचे गाळप करून ४२ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे.

अन्य राज्यांतील स्थिती
कर्नाटकात यंदा ४२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. १५ जानेवारीअखेर कर्नाटकने २६.७६ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये ६२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.   

इथेनॉलबाबतच्या धोरणामुळे साखर उद्योगावर चांगले परिणाम दिसून येतील. इथेनॉलच्या उत्पादनातून साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. तसेच, इथेनॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्यामुळे सरकारलाही त्याचा निश्‍चितच फायदा होईल.
- रोहित पवार, अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन

देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता
कारखाने/ प्रकल्प  - १६६   
प्रतिदिन क्षमता - ८,७५२ कि.लि.
प्रतिलिटर दर - ४३ ते ४९ रुपये

Web Title: Extra Sugar Ethanol