'नीट'ला सामोरे जाताना.. प्रवेश अर्ज भरताय, ही काळजी घ्या! 

दयानंद माने
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे 2019 रोजी होणार असून, तिचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2018 आहे. सध्या विद्यार्थी, पालक या प्रक्रियेत व्यग्र आहेत. यंदा ही प्रक्रिया केंद्रीय मानव साधन संपत्ती विकास खात्याने स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या "एनटीए'मार्फत (नॅशनल टेस्टींग एजन्सी) राबवली जात आहे. 

नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे 2019 रोजी होणार असून, तिचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2018 आहे. सध्या विद्यार्थी, पालक या प्रक्रियेत व्यग्र आहेत. यंदा ही प्रक्रिया केंद्रीय मानव साधन संपत्ती विकास खात्याने स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या "एनटीए'मार्फत (नॅशनल टेस्टींग एजन्सी) राबवली जात आहे. 

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरे जावे लागते. तिच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थी देशभरातील "एमबीबीएस'च्या जवळपास 187 सरकारी महाविद्यालयांतील 15 टक्के कोटा आणि महाराष्ट्र राज्यातील 450 जागांसाठी पात्र ठरतो. तसेच राज्यातील "एमबीबीएस'च्या सरकारी 22 आणि खासगी 19 महाविद्यालयांतील 85 टक्के जागांसाठी, म्हणजेच जवळपास 5200 जागांवरच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो. या महाविद्यालयांत प्रवेशासाठी जातीनिहाय आरक्षण असून, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.

या आरक्षणाव्यतिरिक्त संरक्षण दलातील पालकांचे पाल्य, डोंगरी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणारे विद्यार्थी, तसेच अपंगांसाठीही आरक्षण आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने, या परीक्षेत कमालीची पारदर्शकता आहे. या परीक्षेशिवाय "एम्स' (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस) आणि "जीपमर' (जेआयपीएमईआर) या नामवंत वैद्यकीय संस्थांतूनही वैद्यकीय शिक्षण घेता येते. मात्र त्यांची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे असते. 

अर्ज कसा भरावा? 

- ही परीक्षा ऑफलाईन मोड (पेन पेपर) असली तरी तिची नोंदणी ऑनलाईनच करावयाची आहे. एक नोव्हेंबर 2018 रोजी "एनटीए'ने या परीक्षेचे नोंदणी अर्ज "नीट'च्या वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत.

बारावी (विज्ञान) परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्र आणि भौतिकशास्त्र विषय घेऊन कमीत कमी 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेला पात्र असेल. सर्वात आधी अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि पद्धती समजावून घ्यावी. ऍप्लिकेशन फॉर्मवर क्‍लीक केल्यानंतर तुम्हांला तुमचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर फ्युचर लॉग इनसाठी मिळेल. 

- या अर्जातील सर्व अत्यावश्‍यक बाबी (वैयक्तिक माहिती, परीक्षा केंद्रांची निवड, त्यांचा प्राधान्यक्रम, शैक्षणिक माहिती, अधिकृत पत्ता, पालकांची पूर्ण माहिती) भरल्यानंतर तुम्हांला तुमचे पासपोर्ट आकारातील छायाचित्र, सही आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करावा लागेल. तुमचे छायाचित्र आणि सही पुन्हा एकदा तपासून घ्यावी लागेल. 

- वरील माहिती बिनचूक भरल्यानंतर परीक्षेचे शुल्क भरण्याची वेळ येईल. सर्वसाधारण आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 1400 रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती आणि अपंगांसाठी 750 रुपये आहे. हे शुल्क तुम्ही डेबीट, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग, ई वॅलेट अथवा तत्सम सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा चलन याद्वारे भरू शकता. तुमचे शुल्क यशस्वीरित्या भरणा झाल्यानंतर तुमचे कन्फर्मेशन पेज तयार होईल. त्याचे प्रिंट आऊट घ्या आणि सुरक्षित ठेवा. ते तुम्हांला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत वेळोवेळी सादर करावे लागते. 

परीक्षेचे हॉल तिकीट 

ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज भरला आहे, त्यांना ऍडमिट कार्ड (हॉल तिकीट) मिळेल. ते 15 एप्रिल 2019 पर्यंत तुम्हाला तुमच्या मेलवर पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल. या कार्डावर तुम्ही भरलेली सर्व माहिती, छायाचित्र मिळताक्षणी व्यवस्थित तपासून खात्री करून घ्या. या पीडीएफची प्रिंटआऊट काढा आणि ती तुमच्याजवळ जपून ठेवा. हे कार्ड तुम्हांला परीक्षा हॉलमध्ये प्रवेशताना अत्यंत आवश्‍यक असते. तसेच इतरही कामकाजासाठी उपयुक्त आहे. 

(क्रमशः) 

Web Title: Facing NEET exam Form filling cares