फडणवीस-ठाकरे उद्या एकत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

 मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या आमदारांना सोमवारी (ता. २४) एकत्रित मार्गदर्शन करणार आहेत. 

मुंबई -  मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या आमदारांना सोमवारी (ता. २४) एकत्रित मार्गदर्शन करणार आहेत. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी निवड होणार हे जवळपास निश्‍चित आहे. सोमवारी ही निवडणूक होईल, युतीने एकत्र येऊन विरोधकांवर मात केल्याचा तो क्षण साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात येण्याचे मान्य केले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील वाढत्या आलेखाचा अनेकांना त्रास होतो. त्यांचे नाव उपसभापतिपदासाठी पुढे करणेही काही जणांना अडचणीचे ठरणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis and Uddhav Thackeray meet tomorrow