मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध : विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा शिवसेना युतीचे सरकार कटिबद्ध असून सरकार न्यायालयात  भक्कमपणे सकारात्मक बाजू मांडत आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधान परिषदेत स्पष्ट सांगितले. मात्र यावेळी सभागृहात गोंधळ उडाला.

''तत्कालीन आघाडी सरकारने मतांवर डोळा ठेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला; मात्र युती सरकारने मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असे ते म्हणाले. मराठा समाजाचा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नाही', अशी टीका करत तावडे यांनी युती सरकारच मराठा समाजाला न्याय देईल, असे सांगितले.

विरोधकांनी या मुद्द्यावरून गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. तावडे यांनी या गदारोळातच सरकारची भूमिका मांडली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

हे आरक्षण देण्यासंदर्भात मागासवर्गीय आयोगाकडून लवकरात लवकर अहवाल मिळावा, यासाठी सरकारकडून एकही पत्र गेलेले नाही, असे मुंडे म्हणाले .या आरक्षणासाठी मराठा समाजाने यापूर्वी राज्यात 57 मोर्चे काढले. मात्र आता तालुकास्तरावरही मोर्चे काढले जात आहेत, असे सांगत सरकारने मराठा समाजाचे फसवणूक करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले .हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला.

Web Title: Fadnavis Government committed to give Maratha Reservation, says Vinod Tawde