"जलयुक्‍त'चे अपयश झाकण्याचे प्रयत्न - सचिन सावंत

"जलयुक्‍त'चे अपयश झाकण्याचे प्रयत्न - सचिन सावंत

मुंबई - राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे. हजारो टॅंकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार जनतेला प्रकर्षाने जाणवेल याकरिता टॅंकरची मागणी पूर्ण न करता ती दाबून ठेवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. 

सावंत म्हणाले, की राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता दहा हजारांपेक्षाही अधिक टॅंकरची मागणी गावागावांतून येत आहे. परंतु आजवर पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ 5,174 टॅंकरने पाणी दिले जात आहे. गावातून आलेली मागणी लालफितीतच अडकवून ठेवण्याचे सरकारचे निर्देश असल्याचे समजते. गावोगाव टॅंकरच्या मागे गावकरी पाण्यासाठी तुटून पडल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र अत्यंत विदारक आणि संतापजनक असून केवळ जलयुक्त शिवार योजनेत खर्च केलेले हजारो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले, हा प्रश्न जनता विचारेल म्हणूनच टॅंकरची मागण्या पूर्ण केली जात नाही. मात्र, असे असले तरी जलयुक्त शिवारचे अपयश व त्यातील भ्रष्टाचाराची लक्तरे ही वेशीवर टांगली गेली आहेत हे पूर्णपणे सत्य आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलयुक्त शिवार योजनेची स्तुती करताना राज्यातील 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे म्हटले होते. पण त्यांच्या दाव्यातला फोलपणा सध्याच्या पाणीटंचाईवरून स्पष्ट होत आहे. लातूरमध्ये शेकडो कोटी रुपयांची कामे केल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, असे सांगितले गेले होते. परंतु लातूरमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही, असे सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com