बॅंकांना सलग सुट्ट्यांचा सोशल मिडियावरील संदेश खोटा 

social media
social media

औरंगाबद : एक ते आठ सप्टेंबर दरम्यान बॅंका बंद राहणार असल्याचा मॅसेज सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे. या विषयी इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांनीही बातम्या दाखवल्यामूळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र हा संदेश खोटा असून सप्ताहिक सुट्टी वगळता बॅंका नियमीत सुरु राहणार असल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय)चे सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील शिंदे व एआयबीईचे सहसचिव देविदास तुळजापूरकर यांनी शुक्रवारी (ता.31) "सकाळ'ला सांगितले. 

गेल्या दोन दिवसापासून व्हॉटस्‌ऍप, फेसबुकसह इतर सोशल साईटवरून एक ते 9 सप्टेंबर दरम्यान बॅंका सलग बंद राहणार आहे. यामूळे या सलग सुट्‌टयापुर्वी तुमची बॅंकेची कामे उरकून घेण्याचे आवाहनाचा हा संदेश फिरत आहे. या संदेशाला पुष्टी देणाऱ्या काही माध्यामांनी बातम्या दिल्याने यात सत्यता आली होती. या प्रकरणी "सकाळ' ने औरंगाबाद च्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील शिंदे यांच्याची संपर्क केला असता. ते म्हणाले, बॅंका आठ दिवस बंद राहणार नाही. फक्‍त साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच बंद राहणार असून इतर दिवशी नियमीत व्यवहार सुरु रहाणार असल्याचे स्पष्ट केले. 

काय होते प्रकरण 
"नेमकं प्रकरण काय? : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमध्ये बॅंका 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर असे सलग आठ दिवस बंद राहणार असल्याचे सागंण्यात आले आहे. तसेच लोक एकमेकांना शुक्रवारीच बॅंकेचे व्यवहार पूर्ण करुन घ्या असं सांगत आहेत. 
2 सप्टेंबर : रविवार - साप्ताहिक सुट्टी 
3 सप्टेंबर : सोमवार - दहीहंडी, "बॅंका सुरु' 
4 व 5 सप्टेंबर मंगळवार,बुधवारी - रिझर्व्ह बॅंकेचा संप, मात्र बॅंक सुरु 
6 व 7 सप्टेंबर : गुरुवार व शुक्रवारी बॅंका सुरु 
8 व 9 सप्टेंबर : शनिवार व रविवारी साप्ताहिक सुट्टी 

सप्टेंबर महिन्यात साप्ताहिक सुट्टी, शासकीय सुट्ट्या वगळता इतर सुट्या नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्‌यातही बॅंका नियमीत सुरु राहणार आहे. 
- सुनील शिंदे, सहाय्यक महाव्यवस्थापक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, 

सलग सुट्ट्या विषयी फिरणार मॅसेज खोटा आहे. यात गोकुळ अष्टमीला बॅंकांना सुट्टी नाही. तसेच रिझर्व्ह बॅंकच्या कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामूळे कोणतीही बॅंक बंद राहणार नाही. सप्ताहिक सुट्टी वगळता बॅंका सुरु राहील. 
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com