Congress: लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसने म्हणते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress: लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसने म्हणते

Congress: लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसने म्हणते

महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे. तेव्हापासून जागा वाटपाचा आघाडीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. दरम्यान आज सकाळ पासूनच महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

अशा बातम्या येत होत्या मात्र या बातम्यानवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व बातम्या खोडसाळ असल्याचं काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे.

अतुल लोंढे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लोकसभेसाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक झाली. इथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणूका एकत्रिपणे लढणार आहे. कोणता पक्ष किती जागा लढणार हे असून ठरलेलं नाही. व्हायरल होणारी बातमी चुकीची आहे याचं आम्ही खंजण करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

काय आहे व्हायरल होणारी बातमी

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९, काँग्रेस ८ जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे. मुंबईत ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार आहे.


मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहे. त्यापैकी ठाकरे गट 4 जागा लढणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. मुंबईत ठाकरे गटाला चार जागा सोडण्याचा निर्णय.

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादी आणि उत्तर मुंबईमधून काँग्रेस लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :CongressShiv SenaNCP