NCP: किर्ती कर्तुत्वातही पाहिजे; राष्ट्रवादीचा गजानन किर्तीकरांना खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

NCP: किर्ती कर्तुत्वातही पाहिजे; राष्ट्रवादीचा गजानन किर्तीकरांना खोचक टोला

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली शिवसेनेची पडझड अजूनही थांबताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसला असून, खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत गजानन किर्तीकर यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे "नावात किर्ती असून चालत नाही कर्तुत्वात देखील किर्ती पाहिजे. मिंधे गटात जाऊन आपण काय कीर्ती हे सर्वांनी पाहिले" असं म्हणंत त्यांनी ट्विट केलं आहे.

हेही वाचा: Gujarat: स्टार प्रचारक ठरले! गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 'हे' नेते गाजवणार निवडणुकीचं मैदान

हेही वाचा: Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

शिवसेनेचे जुने नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात काल प्रवेश केला आहे. किर्तीकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठं नुकसान झालं आहे. कारण त्यांचा राजकीय अनुभव हा ठाकरे गटासाठी फार महत्त्वाचा होता.

टॅग्स :Shiv SenaNCP