सासरच्या मंडळींवर आरोप मुद्देसूद हवेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई - कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत सासरच्या मंडळींवर करण्यात येणारे आरोप मुद्देसूद असायला हवेत, त्यामध्ये सरधोपटपणा नको, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालामध्ये नोंदविले आहे. सासू- सासऱ्यांविरोधात सरसकटपणे केलेले आरोप गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत. तक्रारीतील आरोपांत ठळकपणा हवा आणि त्यामध्ये तथ्यता असणेही आवश्‍यक असते, असे न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तक्रारदार सुनेने पती- सासू- सासऱ्यांविरोधात आणि नणंदेविरोधात भादंवि कलम "498-अ' नुसार गुन्हा दाखल केला होता.

या कलमामुळे आरोपांचे गांभीर्य अधिक वाढते. त्याची तीव्रता पाहता त्यामध्ये पुष्टी असणारे पुरावे असणे आवश्‍यक आहे. केवळ त्यांची नावे फिर्यादीमध्ये दाखल करणे पुरेसे नाही, तर त्यांनी कशाप्रकारे छळ केला हे उघड व्हायला हवे, असे न्यायालयाने सांगितले. महिलेने केलेल्या तक्रारीविरोधात नणंदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नणंदेचे वय आणि शिक्षण याचाही उल्लेख खंडपीठाने केला आणि तिच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले. 

Web Title: family violence case