बच्चनजी, तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करु शकता?

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

- शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
- औरंगजेबाच्या नावापुढे मुघल सम्राट ही पद्वी मात्र शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
- अमिताभ बच्चन यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून अनेक प्रेरणादायी प्रवास समोर आले आहेत. मात्र, काल झालेल्या एपिसोडमुळे हा कार्यक्रम एका नव्या वादात सापडला आहे. काल कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

काल कार्यक्रमादरम्यान गुजरातच्या स्पर्धकासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता. ''यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औंरगजेबचा समकालीन होता?'' या प्रश्नासाठी देणअयात आलेले चार पर्याय असे होते-
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3.  महाराजा रणजीत सिंह 
4. शिवाजी

Image may contain: 1 person, text

यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने आता चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे मुघल सम्राट अशी पद्वी लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. 

काही चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्याची मागणी केली आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fans Slams Amitabh Bachchan for disrespecting Shivaji Maharaj in Kaun Banega Karodpati