आता 'देता की जाता'
पुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान क्रांती समितीची बैठक झाली. त्यात जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधातील संताप व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनापासून 19 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी यात्रा काढण्याचे बैठकीत ठरले.

शेतकरी किसान क्रांतीचे समन्वयक जयाजी सूर्यवंशी म्हणाले, 'शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी एक जून 2017 रोजी म्हणजेच दीड वर्षापूर्वी संप केला होता. सातबारा कोरा झाला पाहिजे, दुधाला भाववाढ मिळाली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आदी मागण्या त्या वेळी करण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी फक्त आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी आता पुन्हा शेतकरी किसान क्रांतीच्या झेंड्याखाली एकत्र यावे.''
धनंजय जाधव म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी 3 जून 2017 रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले होते. दीड वर्ष उलटले, तरी या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. शेतकरी संतप्त आहेत. आता माघार नाही. "देता की जाता' असा निर्वाणीचा इशारा आम्ही सरकारला देणार आहोत.''