मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

गुलाब शिंगारी हे मूळचे लासलगावचे आहेत. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप गुलाब शिंगारी यांनी केला. त्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र, त्यांनी नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

मुंबई : मंत्रालयाबाहेर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. लासलगावच्या गुलाब शिंगारी या शेतकऱ्याने नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिंगारी यांचा जीव वाचला. या गंभीर प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

गुलाब शिंगारी हे मूळचे लासलगावचे आहेत. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप गुलाब शिंगारी यांनी केला. त्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र, त्यांनी नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

दरम्यान, मंत्रालयात येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वी १० नोव्हेंबर, २०१७ मध्ये तुळजापूर येथील ज्ञानेश्वर साळवे हा तरुण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील छतावर चढला होता.

त्यानंतर २२ जानेवारी, २०१८ मध्ये धुळे येथील धर्मा पाटील या ८४ वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता गुलाब शिंगारी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

Web Title: Farmer Attempt to suicide in Mantralaya Farmer Gulab Shingari