सरकारचे वर्षश्राद्ध! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणतांबे - शेतकरी संपाला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, सरकारने त्या वेळी दिलेले कोणतेही आश्‍वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न आजही कायम आहेत. याचा निषेध म्हणून येथील शेतकऱ्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन सरकारचे वर्षश्राद्ध घातले. श्राद्धाच्या ठिकाणी काळ्या गुढी उभारली. सरकारने वर्षभर शेतकऱ्यांना आश्‍वासनाचे गाजर दाखविले, असे म्हणत शेतकऱ्यांनी वर्षश्राद्ध प्रसाद म्हणून उपस्थितांना गाजरे वाटली. 

सरपंच डॉ. धनंजय धनवटे म्हणाले, ""शेतकरी संपाची संकल्पना पुणतांबेकरांची. त्याला मागील वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, सरकारने खोटी आश्वासने देऊन संप मोडीत काढला. आज पाण्याला जास्त भाव आहे; पण दुधाला नाही. शेतमालाला भाव नाही. शेतकरी हतबल झाले, तरी सरकारला जाग येत नाही. वर्षभरापूर्वी पुकारलेल्या संपाचे स्मरण करून आम्ही सरकारचे वर्षश्राद्ध घातले.'' 

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांत लक्ष न घातल्यास मतपेटीतून आमची ताकद दाखवून देऊ, असा असा इशारा बाळासाहेब चव्हाण यांनी दिला. बाळासाहेब भोरकडे, दत्ता धनवटे, अशोक बोरबने, रवींद्र धोर्डे, नामदेव धनवटे आदींनी भाषणातून सरकारवर टीका केली. 

गाजरांचे वाटप 
- पुणतांब्यात शेतकऱ्यांकडून निषेध 
- काळी गुढी उभारली 
- प्रसाद म्हणून गाजराचे वाटप 
- मतपेटीतून ताकद दाखविणार 

Web Title: Farmer strike completed today one year