राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याचे कबुली केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग यांनी दिली आहे.

नागपूर - केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याचे कबुली केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग यांनी दिली आहे.

रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या असा प्रश्‍न विचरला होता. त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून आत्महत्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होते. २०१३ साली महाराष्ट्रातील तीन हजार १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यानंतर २०१४ साली चार हजार चार, २०१५साली ४२९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समितीच्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 

समितीमार्फत शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची समीक्षा करून उपयायोजना सुचविणार असल्याचे उत्तरात केंद्रीयमंत्र्यांनी सांगितले.

पॅकेज, योजना ठरल्या फसव्या
आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले होते. दरवर्षी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जात आहेत. मात्र त्याच काहीच फायदा झाल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येत नाही. पॅकेज ही तात्पुरती उपाययोजना आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये याकरिता ठोस उपयायोजना केल्या जात असल्याचे राज्य शासनाचे म्हणने आहे. असे असतानाही आत्महत्या थांबलेल्या नाही. यावरून केवळ आश्‍वासने दिली जात असून शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसावा असे दिसून येते अशी प्रतिक्रिया यावर खासदार तुमाने यांनी व्यक्त केली.

Web Title: Farmer Suicide Increase in State