शेतकऱ्यांना ऊसबिलाचे १२७७ कोटी साखर कारखान्यांकडे थकीत

यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी २२ हजार ४३ कोटी रुपये एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) रक्कम देण्यात आली आहे.
Sugar Factory
Sugar FactorySakal

पुणे - यंदाच्या गाळप हंगामात (Galap Season) राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) ऊसबिलापोटी २२ हजार ४३ कोटी रुपये एफआरपीची (FRP) (रास्त व किफायतशीर दर) रक्कम देण्यात आली आहे. तर, एक हजार २७७ कोटी इतकी रक्कम साखर कारखान्यांकडे (Sugar Factory) थकीत (Arrears) आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी दिली. (Farmers are Tired of Sugarcane Bill 1277 Crore Sugar Factory)

नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात राज्यातील १९० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले. ३१ मेअखेर शेतकऱ्यांना एफआरपीची २३ हजार ३२० कोटी रुपये रक्कम देय होती. त्यापैकी २२ हजार ४३ कोटी रुपये (९४.५२ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, उर्वरित एक हजार २७७ कोटी म्हणजे ५.४८ टक्के एफआरपी अद्याप थकीत आहे. तसेच, २९ साखर कारखान्यांविरुद्ध महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांकडे ६५७ कोटी रुपये थकीत असून, त्यांना साखर जप्तीची नोटीस पाठविण्यात आली आहे.

Sugar Factory
मोदीच ठरलेत जगभरात ‘पप्पू‘ - नाना पटोले

लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर शुगर कारखान्याने २० कोटी ५२ लाखांपैकी एक रुपयाही अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही. सातारा जिल्ह्यातील किसनवीर खंडाळा कारखान्याने चार कोटी ८४ लाख रुपयांपैकी केवळ २५ लाख रुपये दिले आहेत. किसनवीर भुईंज कारखान्याने सुमारे ४१ कोटीपैकी साडेदहा कोटी रुपये दिले आहेत. तर, सांगली जिल्ह्यातील तासगाव एसजीझेड शुगर या कारखान्याने सुमारे ८० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये एफआरपी दिली आहे.

११७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी

राज्यातील ११७ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसबिलापोटी संपूर्ण एफआरपी दिली आहे. तर, ६८ कारखान्यांनी ५० ते ९९ टक्के एफआरपी दिली आहे, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com