जातीपातीच्या राजकारणात शेतकरी संपविला - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

३७० व ३५ अ कलम रद्द करून भाजपने देशहिताचा निर्णय घेतल्याचे स्वागत आहे. परंतु, याच बहुमताच्या जोरावर स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही? यामुळे या सरकारला शेतकरीहिताच्या निर्णयाशी देणघेणे नसून, जातीपातीच्या राजकारणात शेतकरी संपविल्याचे प्रतिपादन ‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज केले.

रेडगाव खुर्द - ३७० व ३५ अ कलम रद्द करून भाजपने देशहिताचा निर्णय घेतल्याचे स्वागत आहे. परंतु, याच बहुमताच्या जोरावर स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही? यामुळे या सरकारला शेतकरीहिताच्या निर्णयाशी देणघेणे नसून, जातीपातीच्या राजकारणात शेतकरी संपविल्याचे प्रतिपादन ‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज केले.

काजीसांगवी येथे चांदवड तालुका प्रहार संघटनेच्या वतीने बुधवारी शेतकरी कार्यकर्ता मेळावा झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार बच्चू कडू म्हणाले, की सरकारकडून ३७० कलमाचा गाजावाजा केला जात  असताना दुसरीकडे हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन नसून कुटुंबीयांची उपासमार होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers ended up in caste politics Bacchu Kadu